कधी काळी त्यांच्याकडून मिलाेची भिक ; आता विमाने आयात करून अमेरिकेत रोजगार वृद्धि

एकेकाळी भारताला अमेरिकेकडून मिलाे नावाचा निकृष्ठ दर्जाच्या गव्हाची भिक घ्यावी लागायची. आज त्याच भारताने दाेनशे विमानांची मागणी नाेंदवून अमेरिकेला दहा लाख राेजगारांची भेट दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्याे बायडेन यांनी स्वत: याबाबत भारताचे आभार मानले आहेत.पायाभूत सुविधा क्षेत्रांत माेदी सरकारने उचललेल्या पावलांमुळे भारताची सर्वच क्षेत्रांत प्रगतीची घाैडदाैड सुरू आहे. यातूनच भारताचे विमानक्षेत्र विस्तारले आहे.

सामान्यांनाही आता विमानप्रवास करणे शक्य झाले आहे. अमेरिकेत तयार झालेली दोनशेहून अधिक विमाने एअर इंडिया विकत घेणार आहे.  ही घोषणा करताना मला अभिमान वाटताे. पंतप्रधान मोदी यांच्यासह ही भागीदारी विकसित करताना आपल्याला अतिशय समाधान वाटत आहे. या करारामुळे अमेरिकेत दहा लाखाहून अधिक जणांना रोजगार मिळे असा विश्वासही बायडेन यांनी व्यक्त केला आहे.अमेरिकेच्या अध्यक्षांनी केलेल्या भारताच्या या काैतुकाला विशेष महत्व आहे. 1972 साली भारतामध्ये दुष्काळ पडला हाेता. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अमेरिकेकडून गव्हाची भिक मागण्याची वेळ आली हाेती. त्यावेळी अमेरिकेने निकृष्ठ दर्जाचा गहू ज्याला मिलाे म्हणतात ताे भारताला दिला हाेता.