शिवजयंतीनिमित्त देवेंद्र फडणवीस यांची शिवप्रेमींना अनुपम भेट

मुंबई : तिथीनुसार साजऱ्या हाेणाऱ्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवप्रेमींना अनुपम भेट दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा 2023-24 चा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शिवप्रेमींची अनेक वर्षांपासूनची मागणी फडणवीस यांनी पूर्ण केली आहे.  आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानास 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्यानांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी  250 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपी शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारले जाणार आहे. त्याचबराेबर  शिवकालिन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.