पुणे जिल्ह्यात सध्या H3N2 विषाणू मुलांसाठी धोकादायक बनला आहे. पाच वर्षांखालील मुले याच्या विळख्यात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये आयसीयू तुडुंब भरले आहेत. बाधित बहुतेक मुलांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बाधित मुलांवर अँटीबायोटिक देखील काम करत नाहीत.
शून्य ते 5 वयोगटात एकही रुग्ण आढलला नाही. तर 6 ते 18 वयोगटात 5 रुग्ण आढलले आहेत. त्याचबरोबर 19 ते 60 गटातील रुग्णसंख्या 13 वर पोहोचली आहे. 60 वयांपेक्षा अधिक वयोगटात 4 रुग्ण आढलेत. त्यामुळे पुण्यातील रुग्णसंख्या आता 22 वर पोहोचली आहे.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी च्या आकडेवारीनुसार, पुण्यात एकूण 2,529 नमुने तपासण्यात आले. यापैकी 428 H3N2 विषाणू पॉझिटिव्ह आढळले आहेत. 15 फेब्रुवारीनंतर घेतलेल्या नमुन्यांमध्ये या विषाणूने ग्रस्त मुलांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्याप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये H3N2 चे रुग्ण वाढतायत. पुण्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 रुग्ण तर नाशकात 3 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
