महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्या प्रकरणी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी नौपाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देणारी क्लिप व्हायरल होत असल्याचे मनसेने कार्यकर्त्यांनी म्हटंल आहे या आधारे तक्रार दाखल केलीआहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील अनधिकृत मशीद, मजार आणि दर्ग्याची उभारणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने तत्परतेने माहिम व सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई करून उध्वस्त केले होते. तर, दुसऱ्याच दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणला होता. या प्रकरणी जाधव यांनी प्रशासनाला 15 दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता. मनसेच्या या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने तात्काळ संबंधित ठिकाणची पाहणी केली होती.
याआगोदर देखीन मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला होता. शिवाजी पार्क परिसरात फिरण्यासाठी गेले असता सकाळच्या सुमारास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा हल्ला झाला होता. यामध्ये त्यांचा हात मोडला होता.
