आर माधवनच्या मुलाने पुन्हा उंचावली भारताची शान; जिंकली पाच सुवर्णपदकं

बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं ही नेहमीच चर्चेत असतात. कलाकारांची मुलं कलाकाराचं होणार असं म्हणतात. काही स्टारकिड्स आहेत जे बॉलिवूडमध्ये त्यांचं करिअर करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत हा अभिनयात त्याचं करिअर करत नसून स्विमिंगमध्ये करत आहे. वेदांतनं पुन्हा एकदा फक्त आर. माधवनचं नाही तर संपूर्ण भारताला त्याच्यावर गर्व होईल असं काम केलं आहे. आता वेदांतनं स्विमिंगमध्ये पुन्हा एकदा 5 गोल्ड मेडल मिळवली आहेत.

अभिनयापासून दूर जात वेदांतने खेळात करियर बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने त्याच्या दमदार कामगिरीने देशाचा गौरव केला आहे. आर माधवनने मुलाच्या विजयाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.

वेदांतने 58 व्या मलेशिया इनव्हिटेशनल एज ग्रुप जलतरण स्पर्धेतही भाग घेतला होता. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये वेदांत भारताचा तिरंगा आणि मेडलसोबत पोज देताना दिसत आहे.