एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य मानून संजय राऊत जर आमच्या गटात येत असतील तर त्याचा आम्ही जरुर विचार करु -शहाजी पाटील

राज्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याच दरम्यानं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 17 ते 18 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र, यातच आता थेट संजय राऊतांना शिवसेना शिंदे गटात येण्याची ऑफर आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे. संजय राऊत जर आमच्या गटात येत असतील तर त्याचा आम्ही जरुर विचार करु असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य मानून संजय राऊत जर आमच्या गटात येत असतील तर त्याचा आम्ही जरुर विचार करु, असे सांगत पाटील यांनी राऊतांना ऑफर दिली आहे. शहाजी बापूंनी थेट राऊतांना पक्षांतराची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजितदादांच्या येण्याने सत्तेत थोडाफार परिणाम असणार पण काळाच्या ओघात तो स्वीकारावा लागणार आहे, असेही ते म्हणाले.

आम्हा 40 आमदारांची भूमिका ही संजय राऊत या एकट्यासाठी निर्माण झालेली नव्हती. संजय राऊतांच्या भोवतीने महाराष्ट्राचे राजकारण फिरत नाही. त्यामुळे आमची भूमिका ही शिवसेना वाढवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी होती, असं सांगत राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली आहे, अशी माहिती आहे. त्यावर मला अद्याप नोटीस आलेली नाही. मात्र, आल्यानंतर आम्ही सात दिवसात कायदेशीर बाजू मांडू, असे शहाजीबापू पाटीलयांनी सांगितले.

शरद पवारांच्या सभांचे परिणाम काय होईल हे आज सांगणे कठीण आहे.मात्र, अजितदादांसोबत आलेले आमदार आपल्या मतदारसंघात ताकदवान आहेत.त्यामुळे शरद पवारांच्या सभांचा फार परिणाम होणार नाही. एक भावनिक युद्ध होईल आणि राजकारण आपल्या मूळ वाटेवरुन चालत राहील,असे सांगताना, आमचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. प्रभावी नेतृत्व आणि निर्णयक्षमता त्यांच्याकडे आहे, असेही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.