मुंबई : राज्यातील मागील आघाडी सरकारने केवळ घाेषणा करण्यापलीकडे शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. कर्जमुक्ती याेजनेची घाेषणा केली मात्र अंमलबजावणी केली नाही. त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2022-23 मध्ये डिसेंबर अखेर 8.13 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 2 हजार 982 कोटी रकमेचा लाभ दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा आर्थिक विकास अहवाल मांडला. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात जुलै 2022 पासून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु करण्यात आली. 2 सन 2022-23 मध्ये डिसेंबर अखेर 8.13 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 2 हजार 982 कोटी रकमेचा लाभ देण्यात आला.
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात जुलै 2022 पासून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु करण्यात आली. लाभार्थी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्ज माफी मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत ऊस आणि फळबागांची शेती करणारे शेतकरी तसेच पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
