पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील 51 हजार तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळ्याअंतर्गत नव्याने नियुक्त झालेल्या 51,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप हे करण्यात आले आहे. ही नियुक्तीपत्रे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली गेली. पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार 51 हजार तरुणांना विविध विभागांमध्ये नोकरीसाठी नियुक्ती पत्र दिले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळ्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वाटप केले.

गृह मंत्रालयाच्या या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमांतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा बल, आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल , इंडो तिबेटीयन बॉर्डर यासारखे विविध सशस्त्र पोलीस दल. पोलीस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो तसेच दिल्ली पोलीस भरती करत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नव्याने भरती झालेल्या 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रे वाटप करण्यात आली. या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान तरुणांनाही संबोधित केले. विविध विभागांमध्ये ही भरती करण्यात आली.

या भरतीमुळे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होईल, असे निवेदनात म्हटले आहे. या भरतीअंतर्गत दिल्ली पोलिसांनाही सक्षम केले जाणार आहे. यासोबतच दहशतवादाचा सामना करणे, अतिरेक्यांना सामोरे जाणे आणि देशाच्या सीमांचे रक्षण करणे यासाठी मदत होईल.पीएमओच्या निवेदनात असे म्हटले आहे की रोजगार मेळा हा युवकांच्या सक्षमीकरणासाठी एक विशेष पाऊल आहे, ज्या अंतर्गत देशाच्या विकासात तरुणांना संधी उपलब्ध करून दिली जाईल. IGOT कर्मयोगी पोर्टलवरील कर्मयोगी या ऑनलाइन मॉड्यूलद्वारे नवीन नियुक्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.