नितीन देसाईंचा एन.डी. स्टुडिओ उध्दव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटू लागलेत. काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका केली. सनी देओलचे घर वाचवले, मग हाच न्याय नितीन देसाईंना का मिळाला नाही, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, त्यांच्या या टीकेनंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी ठाकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले. देसाईंचा एन.डी. स्टुडिओ उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना हवा होता, असा आरोप त्यांनी केला.

चंद्रकांत देसाई यांनी त्यांचा स्टुडिओ विकत द्यावा म्हणून त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. इतकेच नाही तर यामागे मातोश्रीच्या निगडीत व्यक्ती असल्याचे देखील राणे म्हणाले आहेत.नितीन देसाई हा एक चांगला माणून होता. ते फार मेहनती होते. माझे वैयक्तिक फार चांगले संबंध होते. पण देशाला आणि महाराष्ट्राला कळले पाहिजे की, त्यांनी स्टुडिओ विकत द्यावा असा कोणाचा दबाव त्यांच्यावर होता? तर माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा होता. इतकेच नाही तर राणे यांनी एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या मातोश्रीच्या निगडीत माणसाने नितीन देसाई यांना दिल्या होत्या, असा आरोप देखाल यावेळी केला.

नितीन देसाई आत्महत्या प्रकरण काही दिवसांपासून विविध कारणांने चर्चेत आहे. नितीन देसाई प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणावर शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले होते,”नितीन देसाई यांंचं दुःख काय होतं.. हे जर सांगायला आम्ही तोंड उघडलं तर काही लोकांना रत्नागिरीत तोंड दाखवायलाही जागा होणार नाही”. या विधानाने उदय सामंत यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल उपस्थित झाला होता.

काल हिंगोलीच्या सभेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना कलंक, फडतुस, थापाड्या असं संबोधल. शिंदे गटावरही बोचरी टीका केली होती. यावर बोलतांना राणे म्हणाले, मी उद्धव ठाकरे याला नपुसक म्हंटल तर राग येईल, बायल्या म्हटलं तर बोभाटा होणार. त्याला फावड्या म्हटलं तरी राग येईल. त्यांचा पक्ष, चिन्ह तरी त्यांच्याकडे आहे का? स्वतःच्या वडिलांना हे आणि याचं कुटूंब म्हातारा आणि कुत्रा म्हणायचे. बाळासाहेब ठाकरे यांनी जे रुद्राक्ष घातलं, ते यांनी फेकून दिले. हा माणूस हिदुत्वाचा सुर्याजी पिसाळ आहे, अशी टीका त्यांनी केली.