आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. तुम्हाला सर्वांना 2024 साठी राम-राम. आम्ही संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं. 26 जानेवारीला कर्तव्य पथावर नारी शक्ती आणि नारी शौर्य पाहिलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मागच्या 10 वर्षात ज्याला जे सूचलं, त्याने त्या पद्धतीने संसदेत काम केलं. गोंधळ घालण हा ज्या खासदारांना स्वभाव बनला आहे, संसदेच्या सभागृहात गोंधळ घालणाऱ्या खासदारांना पश्चाताप व्यक्त करण्याची ही संधी असल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सर्वांना 2024चा राम-राम, मागील सत्रात नारी शक्ती वंदन अधिनियम पास करण्यात आले. संसदेत नारी शक्तीवर कायदा संमत केला. आजच्या बजेटची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने व मार्गदर्शनाने होणार आहे. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडतील. हे पर्व नारीशक्तीच्या साक्षात्काराचे पर्व आहे. तर, नवं सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
विरोधाचा स्वर तिखट असला, आमच्यावर कितीही टीका झाली तरीही विरोधकांनी जर चांगले आणि योग्य मुद्दे मांडले तर, आपल्या बोलण्यातून ज्यांनी चांगले विचार ठेवले त्यांना लोक स्मरणात ठेवतात. आमच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया दिली असेल तरीही देशातला एक मोठा वर्ग लोकशाहीच्या या मार्गाने केलेल्या टीकेचंही स्वागत करतो. मात्र ज्यांनी लोकशाहीची मूल्यं बाजूला सारणं, तसंच गोंधळ घालणं ज्यांचा स्वभाव आहे त्यांनी माफी मागण्याची वेळ आली आहे.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण उद्या अंतरिम अर्थसंकल्प आपल्या सर्वांसमोर मांडणार आहेत. हा अर्थसंकल्प पूर्ण स्वरुपाचा नाही. कारण, निवडणुकीपूर्वी आपण पूर्ण अर्थसंकल्प सादर करत नाही, त्याच परंपरेचं पालन करत उद्या अंतरिम अर्थसंकल्प मांडल्या जाणार आहे. तेव्हा मला विश्वास आहे की, देश प्रगतीची नवीन शिखरे पार करत सतत पुढे जात आहे. सर्वांगीण विकास होत आहे. सर्वांगीण विकास म्हणजे सर्वसमावेशक विकास होय, जनतेच्या आशीर्वादाने हा प्रवास सुरूच राहणार असल्याचा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
