आरोग्य सुविधेसाठी डबल इंजिन, गोरगरीब जनतेला वैद्यकीय मदत

राज्यातील गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळणे आणखी सोपे होणार आहे. वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता कक्षासोबतच आता उपमुख्यमंत्री सहाय्यता कक्षही सुरू होणार आहे.

आर्थिक दुर्बलांना वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची सुरुवात केली. राज्यातील लाखो जनतेला त्याचा फायदा झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजेच २०१४ पासून राज्यात मुख्यमंत्री सहायता निधीव कक्ष अस्तित्वात आहे. याद्वारे सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा गरजू रुग्णांना पुरवल्या जातात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात या कक्षाचे कामकाज सुरू झाले.

उपमुख्यमंत्री सहायता कक्षाची कक्षाची जबाबदारी रामेश्वर नाईक यांच्याकडे आहे. हा कक्ष बॉम्बे हॉस्पिटल, लीलावती, ब्रिच कँडीसारख्या राज्यातील पंचतारांकित ४६८ धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी १० टक्के राखीव खाटा ठेवणार आहे. धर्मादाय रुग्णालयांमधील एकूण खाटांपैकी १०% खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जातील. रुग्णांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख ८० हजारपर्यंत असल्यास मोफत उपचार मिळतील. वार्षिक उत्पन्न मर्यादा १ ला ८० ते ३ लाख ६० हजारांपर्यंत असल्यास टक्के सवलतीत उपचार सेवा उपमुख्यमंत्री कक्षाकडून मिळेल. या कक्षाच्या मदतीस सर्वच निर्धनांचे आजार पात्र राहणार असून, वार्षिक उत्पन्न मयदिवर थेट पंचतारांकित रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेता येतील.

देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ४६८ रुग्णालयांतील प्रतिनिधींची ऑनलाइन बैठक झाली. त्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाकडून मिळणाऱ्या निर्देश, सूचनांची काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या. धर्मादाय रुग्णांसाठी १० टक्के खाटा आरक्षित करण्याचे काम उपमुख्यमंत्री कक्षाकडून केले जाणार आहे, असे मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे म्हणतात.मुख्यमंत्री सहायता निधी उपचार,
शस्त्रक्रियेसाठी १० ते ५० हजारांपर्यंत मदत केलीजाते. मात्र, आमच्या कक्षाकडून राज्यातील ४६८ धर्मदाय रुग्णालयांतील ६६ हजारपैकी रोज ११ हजार खाटा आरक्षित करण्याचे काम केले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी ऑनलाइन प्रणालीने होईल, असे उपमुख्यमंत्री मदत कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.