राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. याबैठकीत शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरणासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने राज्य पोलिस दलामध्ये AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. यासह संस्कृत, तेलुगू आणि बंगाली साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासह हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार करण्यासाठी रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली “मॅनहोलकडून मशीनहोलकडे” ही योजना राबविण्यात येणार आहे. तसेच संगणक गुन्हे तातडीने निकाली काढण्यासाठी सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्पुरत्या स्वरूपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमितीकरण, संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापण, शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण, राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच आता पर्यंत नियमांच्या बाहेर जाऊन तिपट्ट मदत करण्यात आली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना विविध योजना आणि पिक विमातून ४५ हजार कोटी रूपयांची मदत केल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना 5 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार आहेत जेणेकरून गुन्ह्यांची वेगाने उकल करण्यात येणार आहे. भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप होणार आहे. ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळांसाठी ५० कोटी अनुदान देण्यात आलं आहे. संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार असून सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :

✅ राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी
✅ तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार
✅ मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला
✅ १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
✅ संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार
✅ शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण
✅ विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल
✅ पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
✅ हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’ कडे योजना
✅ संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार
✅ राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
✅ ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान
✅ भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप
✅ संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार
✅ वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन
✅ राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर
✅ श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित.