काही दिवसांपूर्वी बातमी आली कि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते बिहार दौऱ्यावर असताना त्यांना कोरोनाने ग्रासले असल्याचे अनुमान केले जात आहे. त्यांनी ट्विटर वरुन ही बातमी देताच महाराष्ट्र हादरला. कोरोनाने आपल्या लाडक्या नेत्याला आपल्या कचाट्यात घेतलं हे ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. लगेच त्यांची प्रकृति लवकर सुधारावी यासाठी अवघा महाराष्ट्र प्रार्थना करु लागला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना अनेकांचे संदेश मिळाले, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव सुरु झाला.
यातून एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली कि जनतेच्या मनातला नेता कोण आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले. गेले ७-८ महीने जेव्हा पासून देशाला आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राला कोरोनाने ग्रासले आहे, तेव्हा पासून देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्र भर आपल्या जीवाची परवा न करता वण वण फिरताएत. रुग्णालयांची पाहणी, नागरिकांना भेटणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, अगदी ओढ्यातून वाट काढत ओल्या दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना जावून भेटणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. ‘तिळ उसंत नाही जीवाला’ अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यातून बिहार निवडणूकीचे ते स्टार प्रचारक असे असताना द्विगुणीत जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती, आणि ती ते लीलया पेलत देखील होते. महाराष्ट्राचा दौरा त्यांनी बिहार निवडणुकीमुळे मागे पडू दिला नाही, स्वार्थ बघितला नाही, स्वत:च्या करिअरसाठी काय योग्य राहील याचा विचार न करता त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला भेट देणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं अधिक महत्वाचं समजलं. तसेच बिहारची जबाबदारी केंद्राने त्यांच्या भक्कम खांद्यांवर दिली असताना, त्यांनी ती जबाबदारी देखील अतिशय चोख पार पाडली, तिथे सभा घेणं, रात्रंदिवस फिरणं असं अविरत, अखंड काम सुरु होतं. असं निस्वार्थ काम सुरु असतानाच अचानक त्यांना कोरोनाने ग्रासले आणि आता ते विश्रांती घेत आहेत. मात्र ही विश्रांती देखील सक्तीचीच आहे.
विश्रांती घेत असताना देखील ते मॅसेजेसच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यांच्या पर्यंत एखादे महत्वाचे काम पोहोचले कि ते फोन आणि मॅसेजेसच्या माध्यमातून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी जनतेला दिलेला शब्द पाळत सरकारी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. कोविडची सुरुवात झाली असतानाच त्यांनी भाजप नेते आणि त्यांचे मित्र गिरीश महाजन यांना सांगितले होते कि, ‘गिरीश मला कोविड झाला तर मला सरकारी रुग्णालयात दाखल करा.” त्यांना माहीत होते कि त्यांच्या एवढ्या दाणग्या प्रवासामुळे आणि कामामुळे त्यांना कोविड होण्याची दाट शक्यता आहे, मात्र त्यांनी माघार घेतली नाही, आणि सतत काम करत राहिले, आणि आजही करताएत. कोविड असून सुद्धा.
या सगळ्या घडामोडींमध्ये आपण बघितले कि राज्याचे मुख्यमंत्री ‘भिर भिर तर भंवरा ही फिरतो’ असं म्हणत फडणवीस यांची खिल्ली उडवत असताना दिसले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांना ‘कोमट पाणी’ पिण्याचे आणि ‘आमोरासमोर बसून न जेवण्याचे’ सल्ले देताना दिसले. घरात बसून राज्य चालवताना दिसले. मात्र स्वत:ची काळजी न करत मैदानात उतरून काम कोण करतं याची प्रचिती देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सगळ्यांनाच आली.
जेव्हा आपण एखाद्या राज्याची जबाबदारी घेतो, तेव्हा तो एक काटेरी मुकुट असतो. त्या जबाबदारीसह जीवाला धोका, कुटुंबियांना धोका, स्वत:च्या आरोग्याची आबाळ असं सगळं आपसूकच येतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कामातून त्यांनी जाणवून दिले कि जो काम करतो तो खरा नेता असतो, आज त्यांच्या कडे ना कुठली सत्ता, ना कुठली खुर्ची मात्र केवळ जनतेच्या भल्यासाठी त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालत अविरत काम करण्याचे ठरवले आणि परिणाम आपल्या समोर आहे. पण यामुळे ते थांबतिल का? तर याच यत्किंचित तिळमात्रही शंका नाही कि ते बरे होऊन आल्यावर पुन्हा कामासाठी तत्परतेने उभे राहतील. आणि तेव्हा ही जनतेला दिसेल कि खरा नेता कसा असतो.
घरात बसून सल्ले देणं खूप सोपं असतं, मात्र मैदानात उतरुन स्वत:च्या आरोग्या विषयी धोका पत्करून काम करत योध्यासारखं कोविड सारख्या महाभयंकर रोगाच्या सामोरं जायला खऱ्या वाघाचं काळीज लागतं. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामातून खरा वाघ कोण, आणि वाघाचं काळीज कोणाकडे आहे हे सिद्धच झाले आहे. देव त्यांची प्रकृति लवकर बरी करो, आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी ते पुन्हा ठणठणीत होऊन उभे राहो हीच महाराष्ट्राची आई तुळाभवानी चरणी प्रार्थना आहे.
