गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोनाग्रस्त झाल्यामुळे मुंबई येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बिहारची निवडणुक डोक्यावर असताना, प्रचारासाठी अनेक ठिकाणी दिवसरात्र फिरल्यानंतर त्यांना जेव्हा कोरोनाची लागण झाली, त्यावेळेला सगळ्यांनाच काळजी वाटली होती, इतक्या ऐन कामाच्या वेळात, गटातील खंद्या खेळाडूला जख्मी म्हणून परत माघारी फिरल्यावर संपूर्ण संघाला कसे वाटत असेल? अगदी तसेच काहीसे देवेंद्र फडणवीस यांच्या सहकाऱ्यांना आणि चाहत्यांना त्यावेळेला वाटत असणार. मात्र ज्याला खरच मनापासून काम करण्याची इच्छा असते, त्याला कोविड देखील थांबवू शकत नाही.
फडणवीस रुग्णालयात दाखल असून केंद्र सरकार आणि आयसीएमआरने दिलेल्या सर्व गाइडलाइन्सचे पालन करत आहेत नुकत्याच त्यांनी फोनवरुन दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले कि ते सतत मास्क आणि ग्लोव्ह्स घालून असतात, ते विशिष्ट डायट फॉलो करताएत आणि स्वत:ची काळजी घेत आहेत. मात्र एक आणखी गोष्ट त्यांनी सांगितली त्यावरुन त्यांच्या कामाप्रति श्रद्धेची आपल्याला प्रचिती येते.
या मुलाखतीत त्यांनी सांगितले कि, ते लोकांना भेटू शकत नसले तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या समस्या, त्यांचे प्रश्न हे त्यांचे सहकारी एसएमएसच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहोचवताएत आणि ते स्वत: देखील एसएमएस आणि फोन कॉल्सच्या माध्यमातून शक्य तितके प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच बिहार येथे सुरु असलेल्या निवडणुकीसंबंधी तयारी विषयी देखील ते त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात आहेत, आणि तेथील काम देखील फोन कॉल्स, व्हिडियो कॉल्स आणि एसएमएसच्या माध्यमातून बघताएत. एखादा व्यक्ति ज्याला कोरोना सारख्या रोगाची लागण झाली आहे, ज्याला आयुष्यात इतर वेळेला आरामाची अशी संघी मिळत नाही, त्याने या संधीचा फायदा घेत हवा तेवढा आराम केला असता, मनसोक्त झोप काढली असती. मात्र देवेंद्र फडणवीस आवश्यक तितक्याच आरामासह त्यांच्या कामाप्रति देखील सजग आहे, आणि कोरोना झाला म्हणून त्यांची जबाबदारी संपली नाही हे त्यांच्या या कृतीतून जाणवते.
देवेंद्र फडणवीस यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कझी मिळेल सांगता येत नाही, कदाचित ते लवकरच घरी येतील, त्यांची प्रकृति स्थिर आहे, आणि ते दिवसेंदिवस प्रगती देखील करत आहेत. मात्र हे सर्व असताना देखील त्यांचा जनतेसोबतचा कनेक्ट तुटलेला नाही. त्यांच्या पर्यंत सर्व बाबी पोहोचताएत आणि त्याचे निराकरण करण्याचा ते प्रयत्न देखील करताएत. याला म्हणतात कामाप्रती, जनतेप्रती आणि आपल्या जबाबदारीप्रती सच्ची श्रद्धा.
फडणवीस लवकर ठणठणीत बरे होऊन परत येतील, आणि नव्या जोमाने कामाला लागतील, मात्र तोवर त्यांनी विश्रांति सह जनकल्याणालापण प्राधान्य दिले, याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी.
