२००० असो वा २०२० जन कल्याणासाठी चिखल गाळातून, खाच खळग्यातून जाणारे देवेंद्र फडणवीस बदलले नाहीत !

विचार करा एखाद्या गावात पोहोचण्यासाठी अतिवृष्टीमुळे गावाचा मुख्य रस्ताच वाहून गेलाय, गावकरी अडकले आहेत. अशा वेळी एखादा नेता आला असता तर त्याने गावाची पाहणी कशी केली असती ? कडाचित हेलिकॉप्टर मधून, कदाचित दुरूनच. मात्र ज्याच्या मनात समाजासाठी काम करण्याची दृढ इच्छाशक्ति असते ना तो अशा सर्व संकटांवर मात करून जनतेचं कल्याण करण्यासाठी पोहोचतोच. नुकतेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले असताना, दौंड जवळील स्वामी चिंचोली गावात गावाचा मुख्य रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला. अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांनी ओढ्यातून वाट काढत, चिखलात पाई चालत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं जरूरी समजलं, आणि सगळ्यांसमोर एक मोठं उदाहरण ठेवलं. कि नेता असावा तर तो असा ! मात्र हे काही त्यांनी प्रस्तुत केलेलं पहिलं उदाहरण नाही. त्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल.

ही गोष्ट असेल साधारण 2000-2001 ची. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस नागपुरचे महापौर होते. अवघ्या २७ व्या वर्षी ते देशातील दुसरे सगळ्यात कमी वयाचे महापौर म्हणून जगासमोर आले होते. त्यावेळी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. या दुष्काळाचा फटका विदर्भालाही बसला होता. नागपुर आणि नागपुरच्या आसपासच्या भागात पाण्याचा खूप जास्त त्रास होता. नागपूरच्या उन्हाळ्याबद्दल कुणाला सांगायलाच नको. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल यासाठी त्यावेळेला देवेंद्र फडणवीस नागपुर जवळील कन्हान नदीच्या कोरड्या ठणठणीत पात्रात स्वत: उतरले, ते ही ४८-४९ डिग्री तापमान असताना. आणि कितीतरी किलोमीटर हा माणूस चालत गेला. ध्येय एकच होतं, नागपूरच्या जनतेसाठी पाण्याचा प्रश्न सोडवायचा. संपूर्ण पाहणी करून पुढे या पात्रात पाणी आणण्याच्या दृष्टीने अनेक उपायययोजना ही केल्या गेल्या. नागपूरच्या जनतेने तेव्हापासून ते आतापर्यंत नेहमीच देवेंद्र फडणवीस यांना साथ दिली. का ? कारण एकच. त्यांच्या मनात कुठलाही स्वार्थ नाही, आणि जनकल्याणासाठी देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस स्वत:ला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल, मात्र हव्या त्या सर्व उपाययोजना करेल हा विश्वास.

आज पुन्हा एकदा तोच इतिहास घडला, त्यावेळी रणरणतं ऊन होतं, आता अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला रस्ता. त्यावेळी पायाखाली गरम चटके लावणारी माती होती, आता पाय रुतवणारा चिखल. एक गोष्ट नाही बदलली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मनात जनतेसाठी असलेलं प्रेम, आपुलकी, आणि स्वत:च्या मनातील जबाबदारीची भावना.

आजच्या काळात जिथे काही मिनिटे पावसात भिजत प्रचार सभा केली कि ती व्हायरल होते, घरात बसून फेसबुक लाईव्ह केलं कि त्याची चर्चा होते, तिथे कुठल्याही माध्यमासाठी, कॅमेऱ्यासाठी, प्रसिद्धीसाठी आटापीटा न करता, स्वच्छ मनाने आणि जनतेची सेवा हे एकमेव उद्येश्य ठेवून कुठल्याही विषम परिस्थितीत जनतेसाठी काम करणारा असा एक नेता महाराष्ट्राला लाभला आहे, आणि तो म्हणजे “देवेंद्र फडणवीस’ |

महाराष्ट्राची परिस्थिती सध्या बिकट आहे. कोरोना, अतिवृष्टि, पूर असं सगळं एकत्रच आलं आहे, मात्र महाराष्ट्राच्या जनतेसाठी सत्तेत नसूनही सत्तेत असलेल्यांपेक्षा अधिक काम करणारा नेता त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात मिळाला असल्यामुळे महाराष्ट्राचं भविष्य अजूनही सुरक्षित आहे, याची जाणीव या घटनेमुळे होते हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *