महाराष्ट्राच्या निवणडणूका आठवतात ? तसा हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण असं भयंकर राजकीय नाट्य आजवर तरी कुठल्या राज्यात घडलं नसावं, इतका मोठा विश्वासघात, सत्तेच्या लालसेपोटी, खुर्चीच्या लोभापोटी ज्यांच्या विरोधात उभे होते त्यांच्याच गळ्यात गळे घालून सत्ता स्थापन केली, आणि एक अतिशय अभद्र युती करत त्रिकुट सरकार सत्तेवर स्थापन झालं. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपली. आणि उद्धव ठाकरेंची एक नवीनच सेना जन्माला आली. मात्र निवडणुकीच्या आधी एक फोटो भरपूर व्हायरल झाला होता, तो म्हणजे या त्रिकुट सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा पावसात भिजतानाचा फोटो | त्या फोटोमुळे पवारांना भरपूर ‘सिंपथी’ मिळाली, मतं मात्र मिळू शकली नाहीत. तो केवळ एक पब्लिसिटी स्टंट होता, हे आजही अनेकांचं म्हणणं आहे. मात्र खरंच जनतेसाठी पावसात फिरणारा नेता अक्षरश: परवा लोकांनी बघितला, तो म्हणजे खुद्द महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते ‘देवेंद्र फडणवीस’.
जनतेने पवार साहेबांच्या फोटोजना स्टेटस म्हणून ठेवले, प्रचार प्रसार केला, त्यांचा हा फोटो फेसबुक, ट्विटर, अगदी इंस्टाग्रामवरही व्हायरल झाला. मात्र स्वत:च्याच प्रचार सभेत जनतेची मतं मागायला पावसात उभं राहणं म्हणजे काही खूप शौर्याचं काम नाही, असं काहीसं मत समाजाच्या एका समूहाचे होते. आपल्याच प्रचारासाठी तर कुणीही असे करेल, असं जनतेचं मत ठरलं. मात्र आता महाराष्ट्रात कुठल्याही निवडणूका नसताना, कुठलीही प्रचारसभा नसताना, देवेंद्र फडणवीस केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अतिवृष्टीनंतर, ओल्यादुष्काळामुळे त्रासलेल्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले. खरंतर हे काम सरकारचं, मात्र सरकारने, मुख्यमंत्र्यांनी केवळ पुलावरुन पाहणी केली आणि निघून गेले, आणि फडणवीस? ते वाहून गेलेल्या रस्त्यावर देखील वाट काढत, ओढा ओलांडत, चिखलातून पाय रुतवत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले.
त्यांना कुठल्या प्रसिद्धीची अपेक्षा होती का ? तर नाही, कुठल्याही गाजावाज्याची अपेक्षा होती का ? तर नाही, मनात एकच ध्येय होते, ते म्हणजे बळीराजाला आधार देणं, त्याला मदत करणं |
अहो, स्वत:च्या प्रचारासाठी तर कुणीही पावसात भिजू शकतं, मात्र राज्यातील बळीराजाला मदत करण्यासाठी किती नेते पाण्यात, पावसात भिजले सांगा बरं ?
खरा राजकारणी स्वार्थ बघत नसतो, आणि हेच देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध केलं !!!
