अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी लोकसभेत खासदार राहुल शेवाळे यांनी प्रश्न उपस्थित करताना केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती केली. ते म्हणाले की आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं. बिहार पोलिसांच्या चौकशीत माजी मंत्री आदित्य ठाकरे असा उल्लेख होता. अशी माहिती मला मिळाली. यासंदर्भात लोकांसमोर माहिती आलेली नाही. खरी माहिती लोकांसमोर यावी या दृष्टीने गृहमंत्र्यांना विनंती केली.
ते पुढे म्हणाले देशभरातील सुशांतचे चाहते सर्वसामान्य नागरिक यांना उत्तरं मिळायला हवी म्हणून हा प्रश्न मी लोकसभेत उपस्थित केला. सुशांतच्या संदर्भातली खरी माहिती लोकांसमोर यायला हवी. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला काही कॉल आले होते. एयू कोण आहे हे सीबीआयने स्पष्ट केलं नाही. मुंबई आणि बिहार पोलिसांनी तपास केला आहे. सीबीआयने तपास केला आहे. वेगळी तफावत आढळून येते.
सुशांतच्या केस संदर्भातला सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट आलेला नाही. एयू बाबत मुंबई पोलिसांनी जी माहिती दिली ती वेगळी आहे. बिहार पोलिसांनी वेगळी माहिती दिली आहे. बिहार पोलीस खोटं बोलत असेल तर सीबीआयने खुलासा करायला हवा. एयू कोण आहे हे कळायला हवं.
केंद्रीय गृहमंत्री यासंदर्भातला निर्णय घेऊ शकतात.
एयू संदर्भात वेगवेगळी माहिती येते आहे. ती केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून यावी एवढाच हेतू. मुंबई पोलिसांनी त्यावेळी माहिती लपवली असं निदर्शनास येत आहे.
