छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर जालन्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.याच पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या निषेधार्थ काल जळगावमध्ये भाजपने जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर जाळले.
आव्हाड यांनी केलेल्या विधानानंतर सर्वच स्तरावर आक्रमक भूमिका घेतल्या जात आहे. अशातच आव्हाडांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नेत्याने खळबळजनक घोषणा केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाख रूपयांचा इनाम देण्यात येईल, असे भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.जळगावमध्ये आमदार सुरेश चव्हाण हे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याची परंपरा ही राष्ट्रवादीची आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ते विधान का केलं, कोणत्यासंदर्भात केलं हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ काल जळगाव,जालन्यामध्ये भाजपने जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर जाळले. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाख रुपये इनाम देण्यात येईल अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे.
