छत्रपती शिवाजी महाराज नसते तर जितेंद्र आव्हाड जित्तूद्दीन, अजित पवार अझरोद्दीन आणि शरद पवार शामशोद्दीन, पडळकर यांची टीका

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर जितेंद्र आव्हाड हे जित्तूद्दीन, अजित पवार हे अझरोद्दीन, शरद पवार हे शामशोद्दीन आणि रोहित पवार हे रझाक झाले असते असा घणाघात आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.सोलापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसराची पाहाणी करण्यासाठी आले असताना गोपीचंद पडळकरांनी शरद पवार, अजित पवार, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर तोफ डागली.

जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून शरद पवार बोलत आहेत. मतांच्या राजकारणासाठी अशी वक्तव्य करणे ही पवारांची गेल्या पन्नास वर्षांतील कूटनीती आहे. मतांसाठी किती खालच्या स्तराला जावे याचे उदाहरण आहे. तमाम हिंदूंनी हे समजून घेतले पाहिजे.दुर्दैवाने विधानसभेच्या पोटनिवडणुका लागत आहेत. या निवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत तर दोन्ही निवडणुका भारतीय जनता पक्ष लढेल आणि जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.