नाशिक मधून नुकतीच सत्यजित तांबे यांनी निवडणूक जिंकली आणि त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर आरोप केले. काँग्रेसने ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली त्या विषयी त्यांनी आपल्या या पत्रकार परिषदेतून सांगितलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्याशी आपण कशाप्रकारे संवाद केला आणि तरी देखील आपल्यावर अन्याय झाला तरीही आपण काँग्रेसतर्फेच ही निवडणूक लढवली परंतु एबी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवावी लागली असं त्यांनी यावेळी सांगितलं आणि हे सांगत असताना एक प्रकारचा परिपक्व नेता कसा असला पाहिजे हेच सत्यजीत तांबे यांच्या एकंदरीत पत्रकार परिषदेतून दिसून आलं.
सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे व मामा बाळासाहेब थोरात हे देखील अनेक वर्ष झाले राजकारणात आहेत. एक युवा नेतृत्व म्हणून त्यांनी हि नवडणूक लढवली या संदर्भात बोलताना जी परिपक्वता त्यांच्या बोलण्यातून दिसून येते ती महत्त्वाची ठरते त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस पक्षावर व पक्षातील काही नेत्यांवर आरोप केले पण ते आरोप करत असताना ते असे देखील म्हणाले की सगळ्यात राजकीय पक्षांनी मला मदत केली तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे मला मोठ्या भावासारखे आहेत आत्ताच नाही तर आधीपासून त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत सुरुवातीच्या काळात त्यांनी मला मदत केली पण हे सांगत असताना ते हे सुद्धा म्हणाले की सर्वच पक्षांनी मला मदत केलेली आहे. एक काँग्रेसचा युवा नेता या प्रकारे आपलं मत मांडतो व तो सर्वच राजकीय पक्षांशी व पक्षातील कार्यकर्त्यांशी आपले चांगले संबंध ठेवतो व त्याचाच फायदा निवडणुकीत त्यांना झाला. 29 हजार मतांनी सत्यजित तांबे निवडून आले. महाराष्ट्रातील आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता सत्यजीत तांबे यांनी ज्या प्रकारे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध ठेवले हे महत्वाचं आहे एक युवा नेता असा विचार करू शकतो हे बघून इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी या नेत्याकडे पाहून इतर पक्षांशी असलेले आपले संबंध सुधारावेत.
भारतीय जनता पक्ष व शिंदे गट यांच्यावर ठाकरे गटातील नेते नियमित आरोप करत असतात व हे आरोप करताना ज्या शब्दांचा प्रयोग केला जातो जसे की गद्दार ओके ते विकले गेलेले नेते आहेत त्यापेक्षा खालच्या पातळी जाऊन काही नेते बोलतात या नेत्यांमध्ये आघाडीवर असतात ते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरेंसारखा नेता जो ठाकरे गटाचा महत्त्वाचा नेता व युवा नेता आहे महाविकास आघाडीचे सरकार असताना ती मंत्री देखील होते त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी राहिलेली होती पण आज त्यांची ज्या प्रकारे वागण्याची व बोलण्याची पद्धत आहे विशेष शिंदे गटाबद्दल किंवा भाजपा बद्दल बोलताना ते ज्या प्रकारे बोलतात ते पाहता व सत्यजित तांबे यांची पद्धत पाहता दोघांमध्ये एक अमुलाग्र बदल आहे तो कालच्या पत्रकार परिषदेमधून दिसून आला. एका नेत्याने राजकारणामध्ये परिपक्व कशाप्रकारे व्हायला पाहिजे व राजकीय विरोध असताना राजकीय विचारधारा वेगळी असताना आपापल्या स्वातंत्र्य विचारांनी वागत असताना ज्या प्रकारे विरोधकांना सोबत घेऊन किंवा वेळेप्रसंगी विरोधकांना मदत करून तुम्ही वावरत असता यावरून तुमची राजकीय परिपक्वता दिसते ती परिपक्वता गेल्या काही दिवसांमध्ये सत्यजीत तांबे यांच्यामध्ये दिसली आहे.सगळेच राजकीय पक्ष एकमेकांचे राजकीय विरोधक असतात पण ते वैचारिक दृष्टीने हे त्यांनी समजून घेतले.
एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबतच्या आमदारांना आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा दांडगा अनुभव आहे तरी देखील रोज आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबतच्या आमदारांवर टीका करत असतात त्यांना आव्हान देतात माझ्या मतदारसंघात या आणि निवडून दाखवा उद्योग कसे राज्या बाहेर चालले आहेत यावर माझ्याशी चर्चा करा मी आव्हान देतो अशा प्रकारच्या वल्गना आदित्य ठाकरे रोज करतात तसेच खोके, गद्दार, ते विकले गेलेले आहेत असे माध्यमांसमोर बोलताना आदित्य ठाकरे दिसतात हे सगळं आदित्य ठाकरे बोलतात ते त्यांचं अपरिपक्व राजकारण्याचं रूप आहे. तुमच्या पक्षातून अनेक आमदार बाहेर गेले त्यामुळे तुम्हाला राग येणे स्वाभाविक आहे पण त्यावर बोलताना टीका करताना तुम्ही पातळी सोडू नये खर म्हणजे यावर उद्धव ठाकरे यांनी बोलले पाहिजे. तर ते योग्य ठरेल पण उद्धव ठाकरे मौन बाळगून आहेत. 2030 मध्ये तांबे कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत तरीदेखील त्यांचे सगळ्या पक्षांचे चांगले संबंध आहेत त्यांच्या प्रतिकदेखील सगळ्या पक्षातील नेत्यांमध्ये आदर आहे हेच एका चांगल्या राजकारणाचं लक्ष नसतं हे आदित्य ठाकरे यांनी लक्षात घ्याव व सत्यजित तांबे यांचा आदर्श घेऊन इथून पुढे राजकारण करावे.
