लव्ह जिहाद नेमके कसे होते याची असंख्य उदाहरणे देत पुराव्यासह माहिती देतो. तुमच्या ज्ञानात भर घालतो असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे आव्हान स्वीकारले आहे.लव्ह जिहाद विरोधात कायदा होण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी हिंदू आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. लव्ह जिहादची व्याख्या काय? त्याचा अर्थ जर कोणाला माहिती असेल तर मी चर्चा करायला तयार आहे असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला प्रतिउत्तर देत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुप्रिया सुळेंना चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. वेळ अणि तारीख ठरवा. तुमच्या ज्ञानात भर टाकणार लव्ह जिहाद नेमकं कसा होतो याची पुराव्यासकट माहिती द्यायला तयार आहे. वास्तव समोर आल्यावर सुप्रियाताईही आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राणे म्हणाले की मी लव्ह जिहाद या मुद्द्यावर चर्चा करायला तयार आहे. मी हे आव्हान स्वीकारायला तयार आहे लव्ह जिहाद कशाला म्हणतात? लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींना फसवलं जाते. त्यांचे आयुष्य खराब केले जाते. याची असंख्य उदाहरणे आणि या प्रकरणातील मुलींना भेटवण्यास देखील मी तयार आहे. कोणी कोणासोबत लग्न करावे, यावर आक्षेप नाही. परंतु लग्नाच्या नावाने, प्रेमाच्या नावाने आधी नाते अमर असते, त्यानंतर अमीन होते. याला प्रेम प्रकरण म्हणता येणार नाही. लग्नानंतर हिंदू मुलींना नाव बदलायला सांगितले जाते. त्यांना कुराण वाचायला सांगितले जाते. इतकेच नाही तर तिला हिंदू सण साजरे करण्यास देखील बंदी केली जाते. काहींचे बळजबरीने धर्मांतर केले जाते त्या मुलींची प्रत्यक्ष भेट घालून देणार आहे एखाद्या मुलीने धर्मांतर केले नाही तर तिला मारून टाकल्याची देखील अनेक उदाहरणे आहेत.
