काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांबाबत नाराजी व्यक्त केलीये. तसंच सत्यजीत तांबे प्रकरणात बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला
राज्याच्या राजकारणत चर्चेचा विषय ठरलेली नाशिक पदविधरची निवडूक पार पडली. या निवडणूकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून विजय मिळाला. मात्र या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते.यांनंतर काल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी काल आपली भूमिका मांजताना पक्षातील नेत्यांबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार केल्याचे बोलले जात आहे यावर पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पटोले म्हणाले की थोरातांनी काय पत्र लिहीलं हे मला माहिती नाही. बाळासाहेब थोरातांनी पत्र लिहीलं असेल तर त्यावर उत्तर देता येईल. त्यांनी असं कुठलही पत्र लिहीलं नसेल असं मला वाटतं असंही पटोले म्हणाले.पुढे बोलताना पटोले म्हणाले की, थोरात काय बोलतात ते मला माहिती नाही. ते आमचे नेते आहेत. या सगळ्या प्रकरणावर पक्षाच्या पातळीवर चर्चा व्हावी यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी १३ तारखेला प्रदेश कार्यकारणीची बैठक ठेवली आहे. त्यावेळी घरातील प्रश्न घरात सोडवण्याचा प्रयत्न असेल असे पटोले म्हणाले.
