आव्हाडांचा इतिहासाचं वेगळा

आपण जितेंद्र आव्हाड यांना नेहमीच इतिहासाबदल बोलताना पाहिले आहे. त्यात मग शिवाजी महाराजांचा,मुगलांचा,शाहू,फुले,आंबडेकरांचा इतिहास असेल. त्यांची मांडणी अशी असती की बाकीचे इतिहासकार फिके पडतील. इतका तंतोतंत अभ्यास जितेंद्र आव्हाड यांचा आहे. असा त्यांना दाखवायचे असते. त्यांच्या देहबोलीतून ते स्पष्टपणे जाणवते. त्यांना असे दाखवायचे असते कि त्यांनी किती पुस्तके वाचलेली आहे. इंग्रजी लेखकांचे नावे ते घेत असतात. त्यावरून वाटायला लागते यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यामुळे ते जे सांगतात तेच खरं बाकी बाकीचे इतिहासकार काय सांगतात त्यात तथ्य नाही.

नुकतीच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यात ते म्हणाले, अफझलखान, शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहे. त्यांनी एक प्रकारे हे सांगण्याचा प्रयत्न केला की शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अफझलखान, शाहिस्तेखानाचे काय महत्व खूप आहे. त्यांना असं म्हणायचं कि अफझलखान, शाहिस्तेखान आहे यांना जर वगळले तर शिवाजी महाराजांच्या इतिहासात फारस काही राहणार नाही.असेच काही सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. असं बोलल्यावर खरतर त्यांच्यावर टीका होणे गरचेचे होते, मात्र त्यांच्यावर तशी टीका झालेली नाहीये.

आपण पाहतोय गेल्या काही महिन्यात राज्यपाल, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड असतील यांनी केलेल्या वेगवेगळ्या विधानावरून किती गदारोळ माजला होता. कुठलही एक वाक्य घ्यायचं त्यात काहीतरी अर्थ शोधायचा, जोडायचा मग तो अपमान कसा झाला. त्यावर मग दिवसभर चर्चा करायची, मात्र आता जितेंद्र आव्हाड एवढं बोललेले आहे. त्यावर कुठेही फारशी टीका झालेली नाही, त्यावर गदारोळ फारसा झाला नाहीये. त्याला फारशी प्रसिद्धी देण्यात आलेली नाहीये. अफझलखान, शाहिस्तेखान त्यांचा जो शेवट झालेला आहे, त्यातल असे साहसी प्रसंग आहे. त्यात मग कुठ शिवाजी महाराज येतात. शाहिस्तेखानाचे बोट तोडणारे कोण? मग त्यात कुठं शिवाजी महाराज येतात. अफझल खानाचा कोठडा काढला म्हणून शिवाजी महाराज आहे. यापलीकडे त्यांचं काही कर्तृत्व नाही. असेच त्यांना काही सुचवायचे कि काय, असेच जणू वाटायला लागते.

शिवाजी महाराजांचं कर्तव्य फार अफाट आहे. खरतर आव्हाडांनी सांगितले ह्या दोन घटना त्यातला एक भाग आहे. शिवरायांच्या कारकीर्द अभ्यासताना त्यांचा राज्यकारभार, रणनीती, बुद्धीचातुर्य असे अनेक पैलू लक्षात येतात. मात्र आव्हाडांना म्हणायचं की हे दोघे आहे म्हणून शिवाजी महाराज आहे. विशेष म्हणजे या संदर्भात कोणी त्यांना अपमान केलाय असे म्हणत नाहीये. याआधीच्या घटना देखील चुका झाल्या होत्या, मात्र त्या चुका न ठरवता अपमान ठरवण्यात आल्या. जितेंद्र आव्हाडांनी इथं थेट वक्तव्यच केले आहे. या पद्धतीने इतिहासाची मांडणी ते नेहमीच करत असतात. अशा मांडणीत मुगलांना पाठीशी घालण्याचा त्यांच्यावर फारशी टीका न करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

काही दिवसापूर्वी अफझल खानाच्या कबरी जवळचे अतिक्रमण हटवण्यात आले. त्याविषयी त्यांना विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले ज्यावेळी त्यांचा कोथळा बाहेर काढण्यात आला.तेव्हा जिजाऊ म्हणाल्या आता तुमचं वैर संपलं त्याला इथं दफन करूयात. त्यासाठी जिजाऊ यांनी जातीने लक्ष्य दिले त्यासाठी जमीन देण्यात आली. वारंवार त्यांच्या बोलण्यात इतिहासाची जी मांडणी होती. त्यात मुसलमानांना कुठं दुखवायचे नाही, हाच प्रयत्न त्यांचा असतो. हे सांगत असताना त्यांच्या बोलण्यात इतरही काही मुद्दे येतात. मध्येच पाकिस्तान, जिना, ब्राम्हण,गांधीजी, सावित्रीबाई फुले,सरस्वती पूजा येते. नेमके ते कोणत्या विषयांवर बोलतात कळायला मार्ग नसतो. मात्र ते सर्वज्ञानी आहेत असेच त्यांना वाटत राहते. कृष्णा भास्कर कुलकर्णी,बाबासाहेब पुरंदरे यांच्याबदल त्यांना इत्यंभूत माहिती आहे. ह्या सगळ्याच मुद्दामध्ये गोंधळ निर्माण करतात. त्यांचे विधान विचित्र आहे. आता ते म्हणतील माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला. नेहमीच ते इतिहास सांगताना सरमिसळ करतात, त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. हा गोंधळ निर्माण करण्यामागे एकच उद्देश असतो, तो म्हणजे कुठेही मुस्लिम दुःखी होऊ नये. शिवाजी महाराजांची महती सांगताना कुठेही मुस्लिमांना वेदना होऊ नये. हा प्रयत्न त्यांचा दिसतो, याची काळजी घेताना ते दिसतात.