आव्हाडांच्या वादात विनाेद तावडे यांची उडी, लाॅजिक समजावत प्रत्युत्तर

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपचे नेते विनाेद तावडे यांनी जाेरदार प्रत्युत्तर दिले आहे. मला जितेंद्र आव्हाड यांचे लॉजिक समजत नाही, अशी टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील सभेत बोलताना “शाहिस्तेखान, औरंगजेब आणि मुघल शासक होते, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते”, असे सांगत माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावेड यांच्या एका जुन्या वक्तव्याचा दाखला दिला. “विनोद तावडे यांनी अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास काढून टाकणार असल्याचे सांगितले होते.” तावडे यांनीन ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले आहे.

तावडे यांनी म्हटले आहे की, “मी शिक्षण मंत्री असताना मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार, असं जितेंद्र आव्हाड एका भाषणात म्हणाले. मी सांगू इच्छितो की, मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ छत्रपतींचा शौर्याचा इतिहास काढणार असे होत नाही. मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांची भलामन करणारा इतिहास बाजूला काढणार. मोगलांनी कलेला आश्रय दिला, त्यांचे स्थापत्यशास्त्र चांगलं होतं, हा इतिहास काढणार. ‘अकबर द ग्रेट’ ज्याने लाखो हिंदूची कत्तल केली, याची शिकवण बाजूला काढणार. मला जितेंद्र आव्हाड यांचे लॉजिक समजत नाही.

शाहिस्तेखान, औरंगजेब शिकवला म्हणजे महाराजांचे शौर्य कळते का? त्यांना असं म्हणायचं आहे का, कसाब आला म्हणून शहीद तुकाराम ओंबळे, करकरे यांचे शौर्य दिसले. ते शूर होतेच, त्यासाठी कसाबने येण्याची गरज नव्हती. मला एक दिवस विनोद तावडे विधानसभेत म्हणाले, आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातून काढणार. मग शिवाजी महाराज गोट्या खेळताना दाखविणार का? समोर औरंगजेब आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. त्यातून शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवितात हे जगासमोर येते. १६६९ मध्ये जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा खजिन्याचे टाळे उघडा, हे सांगणारे शिवाजी महाराज जगातले पहिले राजे होते.”, असे वक्तव्य आव्हाड यांनी पुणे येथील सभेत केले होते. आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांच्याविरुध्द निषेध आंदाेलन सुरू केले आहे. अजित पवार यांनीही आव्हाड यांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नाही, असे सांगितले आहे.