टिळकांना उमेदवारी देतो ; निवडणूक बिनविरोध करा – चंद्रशेखर बावनकुळे

महाविकास आघाडीने कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध केल्यास टिळक कुटुंबियांना उमेदवारी देऊ असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. पोटनिवडणुकासाठी उमेदवारी न दिल्याने टिळक कुटुंबीय नाराज असल्याचे समोर आले. पुण्यातून याचे पडसाद दिसायला सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज काँग्रेसला निवडणूक बिविरोध करण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेण्याची गरज असल्याचं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. आम्ही टिळकांना उमेदवारी देतो, तुम्ही निवडणूक बिनविरोध करा, असे आवाहन करताना बावनकुळे यांनी काँग्रेला आज दुपारर्यंत उमेदवारी अर्ज मागे घावी असे म्हटले आहे.

दरम्यान, भाजपमध्ये मलाही तिकीट मिळालं नव्हतं. त्यामुळं जात, धर्म, पंतांच्या आधारावर तिकीट दिलं जात नाही. टिळकांच्या घरी आमदारकी होतीच, दुर्दैवाने ते पद गेलं. खरं तर हा फ्लेक्स ब्राह्मण समाजाने लावलेलं आहे का? कोणीतरी खडा टाकण्याचं काम केलंय, त्याचा शोध घेतोय. ब्राह्मण समाजाचं पक्षात खूप मोठं योगदान आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे.