शरद पवारांचा चेहरा अगोदरच विश्वासघाताने, गद्दारीने, पाठीत खंजीर खुपसण्याने काळवंडलेला होता. मागच्या महिन्यामध्ये त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यावर शिक्कमोर्तब केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकच वाक्य टाकल्यामुळे शरद पवारांचा मूळचा काळवंडलेला चेहरा आता डांबरा सारखा काळा झाला असा हल्लाबाेल भारतीय जनता पक्षाचे आमदार गाेपीचंद पडळकर यांनी केला.
कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी धुळ्यामध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाेलताना पडळकर यांनी पवार यांच्यावर चाैफेर हल्ला केला. सरकार पडणार असे म्हणणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधताना पडळकर म्हणाले शरद पवार व संजय राऊत या जीर्ण झालेल्या फाटक्या नोटा आहेत. चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. सरकार फुल स्ट्रॉंग आहे विविध जमातींच्या प्रश्नांवर पवारांनीच घाण आणि नीच राजकारण केल्याचा आरोप पाडळकरांनी केला. आदिवासी जमातीसह 33 जमातींवरती अन्याय करण्यासाठी पवारांनी काही लोक जवळ ठेवले होते आणि ते आदिवासी जमातीचेच होती. धनगर समाजाला आरक्षणास विरोध करणारे लोक देखील शरद पवारांच्या जवळचेच होते या सर्वांचा सूत्रधार एकच आहे म्हणूनच मी दर वेळी पवारांवर बोलतो.
