राज ठाकरे यांचा टायमींग साधत उद्धव ठाकरेंना टाेमणा ; बाळासाहेबांचा व्हिडीओ केला ट्विट

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाळ उध्दव ठाकरे यांनी गमावल्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ ट्विट करत टाेमणा मारला आहे. नावाला जपा, नाव गेलं की परत येत नाही असे बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.

ट्विटसाेबत राज ठाकरे यांनी दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं.राज ठाकरे यांनी ट्विट केलेल्या  व्हिडीओमध्ये  बाळासाहेब ठाकरे म्हणत आहेत, नाव आणि पैसा. पैसा येताे,  पैसा जाताे,  पुन्हा येताे. पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. ते येऊ शकत नाही. काळ्या बाजारात सुद्धा मिळायचे नाही. म्हणून नावाला जपता. नावाला माेठं करा.राज ठाकरे यांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ सध्या माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.