माफियांना मातीत गाडू; योगी आदित्यनाथ यांचा इशारा

माफिया को मिट्टी में मिला देंगे (माफियांना मातीत गाडू) असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.उत्तर प्रदेश विधानसभा सभागृहात राजू पाल हत्याकांडाबाबत बोलताना योगींनी विरोधकांवर हल्ला केला. ते म्हणाले की आम्ही माफियांना माती गाडू आम्ही माफियांच्या विरोधात आहोत. कोणत्याही माफियाला सोडणार नाही. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था या स्थितीबाबत कठोर आहेत. गेल्या सहा वर्षाच्या योगीराजमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडले. विरोधकांवर जोरदार हल्ला चढवताना योगी म्हणाले की, समाजवादी पार्टीने अतिक अहमदला आश्रय दिला आहे. गुन्हेगाराला खासदार करायचे आणि मग तमाशा घालायचा.

सपा पक्ष हा माफियांचा पोशिंदा आहे. राजू पाल हत्याकांडात अतिक अहमद दोषी आहे. सपाने त्याला आमदार करून पाठिंबा दिला अलाहाबाद पश्चिमेतील बसपाचे माजी आमदार राजू पाल यांची 25 जानेवारी 2005 रोजी सुलेमासराय येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांची पत्नी पूजा पाल या कौशांबीच्या चैल मतदारसंघातून सपाच्या आमदार आहेत. राजू पाल हत्येप्रकरणी माजी खासदार अतिक अहमद आणि त्यांचा धाकटा भाऊ माजी आमदार खालिद अझीम उर्फ ​​अश्रफ यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. उमेश पाल हा घटनेचा मुख्य साक्षीदार होता. तो राजू पाल यांच्या पत्नी पूजा पालच्या मावशीचा मुलगा होता.

राजू पाल खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे होता. यामध्ये उमेश पाल हा मुख्य साक्षीदार होता. त्यामुळेच त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. राजू पाल यांच्या पत्नी आमदार पूजा पाल यांनीही साक्ष प्रभावित करण्यासाठी उमेश पालची हत्या केली असावी अशी भीती अनेकदा व्यक्त केली होती. उमेश पाल यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले होते.