हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर ईडीकडून पुन्हा छापे

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर ईडीकडून पुन्हा छापे टाकण्यात आले .साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी हा तपास केला जात असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना घोटाळा प्रकरणी होत आहे.

कोल्हापूर आणि पुण्यातील मुश्रीफांचे निवासस्थान आणि कार्यालयांत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे. दरम्यानया आधीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी धाड टाकून त्यांची चौकशीही केली होती. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. 2020 साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चालवण्यात देण्यात आला होता.

या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. दरम्यान हसन मुश्रीफ यांच्यावर 24 मार्च पर्यंत कुठलेही कारवाई न करण्याचे न्यायालयाचे निर्देश दिले आहेत.हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अर्ज केला होता.