मुंबई : ‘आपल्या बुद्धीचा आणि बजेटचा दुरान्वये संबध नाही, उद्धव ठाकरे, बजेट तुमच्या बुद्धीच्या आवाक्या पलीकडचं आहे. आणि हो, घरगड्याला ‘गाजराचा हलवा’ वाटने साहजिकच आहे. घरगडी, घरात बसून गाजराचा हलवाच बनवत असतो. त्यामुळे, घरगड्याला प्रत्येक गोष्टीत गाजराचा हलवा दिसतो.’’ अशा शब्दांमध्ये भाजपाने उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. पाच ध्येयांवर आधारित असणारा हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यावर काय टीका करावी असा प्रश्न विरोधकांना पडला होता.
मात्र विरोधासाठी विरोध करण्यासाठी विरोधकांकडून हा अर्थसंकल्प नुसता शब्दांचा फुलोरा, हवेचे बुडबुडे असल्याची टीका केली गेली. उद्धव ठाकरे यांनी तर हा अर्थसंकल्प गाजराचा हलवा असल्याचं म्हटलं, शिवाय आज सामनाच्या अग्रलेखातूनही यावर टीका केली गेली. या टीकेला भाजपाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले,आपल्याला अर्थसंकल्पातील काहीच कळत नाही, अशी जाहीर कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली होती अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच आपण प्रतिक्रिया देतो असेही ते म्हणाले होते. त्याचा आणखी एक पुरावा म्हणजे आजचा सामनाचा अग्रलेख. थोडा अर्थसंकल्प नीट ऐकला असता तर असलं लिहायचं धाडस झालं नसतं.
