दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है; देवेंद्र फडणवीस यांचे विराेधकांना आव्हान

दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है. मुश्किलें जरुर है, मगर ठहरा नही हूँ मैं, मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंचा नही हूँ मैं, अशी शायरी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विराेधकांना आव्हान दिले

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे  आमदार धनंजय मुंडे यांनी  शायरीतून राज्य सरकारवर टीका करताना म्हटले हाेते की, इत्र से कपड़ों को महकाना बड़ी बात नहीं….मज़ा तो तब हैं जब खुशबु आपके किरदार से आये. यावर शायरीतूनच त्यांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है. मुश्किलें जरुर है, मगर ठहरा नही हूँ मैं, मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंचा नही हूँ मैं,
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात भाषण करताना फडणवीस यांनी सभागृहातील ताण हलका केला.

उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ही खूपच कमी आहे असे विरोधक म्हणत आहेत. वर्षाला मिळणाऱ्या मदतीचे विरोधकांनी गणित मांडून महिन्याला किती आणि दिवसाला किती असेही हिशेब मांडले आहेत. पण मी साऱ्यांना सांगू इच्छितो की, ज्यावेळी अवकाळी किंवा अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे जेव्हा शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचे नुकसान होते तेव्हा त्याच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही. त्यावेळी शेतकऱ्याने न खचता पुन्हा उभे राहावे म्हणून तो भिजाई घ्यायला जेव्हा बाजारात जातो त्यावेळी त्याला या ६००० रूपयांच्या मदतीचा उपयोग होईल अशी आमची खात्री आहे. छोट्या गोष्टीनेच सुरूवात करायला हवी. आता जी रक्कम आहे, त्यात भविष्यात कदाचित वाढदेखील करता येईल. सुरुवात महत्त्वाची असते, ती तुम्ही नाही केली. तुमच्या ( महाविकास आघाडीच्या ) काळात मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे होते, त्यावेळी त्यांनी ही सूचना मांडली होती. पण तुम्ही ती मान्य केली नाहीत. मी बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पटकन ऐकतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या वाक्यावर शेजारीच बसलेले एकनाथ शिंदे अक्षरश: खो-खो हसले. इतकेच नव्हे तर सभागृहातील इतर सदस्यही हसू लागले.