ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस बजावण्यात आली आहे. राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली आहे. 20 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घराचीही पाहणी एसीबीकडून करण्यात आली होती. तसेच, त्यांना चौकशीसाठीही बोलावण्यात आलं होतं.
ही दुर्दैवी बाब आहे.सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य शिवसैनिक आमदार झालेला आहे.उद्धव ठाकरेंसोबत जे आमदार आहेत. त्यांनाच नोटीसा पाठवल्या जात आहेत. तिकडे जाणारे वॉशिंगमशिनसारखं स्वच्छ होतात आणि आम्ही फक्त दोषी. मला नोटीस पाठवल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना नोटीस पाठवण्याची गरज काय? असे राजन साळवी यांनी म्हटले आहे.
