अजय देवगणच्या ‘भोला’ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग; पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी रुपये

बॉलिवूडचा सिंघम अशी ओळख असणाऱ्या अजय देवगण हा आयकॉनिक अभिनेत्यांपैकी एक आहे. अजय गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अजयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या अजयच्या दृष्यम-2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता त्याचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. भोला हा चित्रपट काल रिलीज झाला. भोला या चित्रपटाचं अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. पहिल्या दिवशी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे.

भोला या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा अजय देवगण आणि तब्बू यांची जोडी पहायला मिळाली. ‘दृश्यम 2’मध्येही या दोघांनी एकत्र काम केलं होतं. आता तब्बू पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत परतली आहे. सुरुवातीच्या आकड्यांनुसार ‘भोला’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं जातंय. या चित्रपटाने गुरुवारी जवळपास 11.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आता विकेंडला चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेन असे म्हटले आहे. दरम्यान, भोला आणि अजय-तब्बूचा सगळ्यात शेवटचा चित्रपट ‘दृष्यम 2’ यांच्यात तुलना केली, तर ‘दृष्यम 2’ नं पहिल्याच दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. भोलानं ‘दृष्यम 2’ पेक्षा कमी कमाई केली असली तरी देखील लवकरच विकेंडमुळे चित्रपट चांगली कमाई करणार.