भाजपा नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभेची जागा महाविकास आघाडी लढवेन, अशा आशयाचं विधान केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या या विधानावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
यावर बोलताना अजित पवार म्हणले, लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. अशा भाषेत अजित पवारांनी संताप व्यक्त केला. गिरीष बापट यांना जाऊन आज फक्त तिसरा दिवस आहे. इतकी काय यामध्ये घाई आहे. काही माणुसकी प्रकार आहे की नाही. काही महाराष्ट्राची परंपरा आहे की नाही. लोकं म्हणतील यांना थोडी तरी जनाची नाही तर मनाची आहे की नाही. अशा शब्दात अजित पवारांनी वडेट्टीवारांनी सुनावलं
पुण्यातील पोटनिवडणुकीबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणाले होते, की ‘आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. पुण्यात बिनविरोध निवडणूक होणार नाही.’ पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिलं. प्रत्येकवेळी भाजप लढली आहे. त्यामुळे आम्हीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. असे वडेट्टीवार म्हणाले होते.
