दिलासादायक बातमी : 10 ते 12 दिवसानंतर कोरोना रुग्णवाढ कमी होणार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. कोरोनाचा धोका पुढील काही दिवसात कमी होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी होईल. त्यामुळे कोरोनाचे टेन्शन कमी होणार आहे.

कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने केंद्र सरकार सतर्क झाले. केंद्राकडून राज्यांना तात्काळ कोरोनाबाबत सूचना जारी केल्यात. सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी तसेच सरकारी कार्यालये, शाळा – महाविद्यालयांत मास्क वापरण्याबाबत आवाहन केले आहे. कोरोनाची चिंता व्यक्त होत असताना आता दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना तज्ज्ञांचे मते, कोरोनाबाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे आणि ते कमी राहण्याची अपेक्षा आहे.

देशात सध्या जवळपास 45 हजार अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
देशात कोविड रुग्णांची संख्या वाढली असली तरी कोरोना स्थानिक टप्प्याकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे पुढील 10-12 दिवसांपर्यंत कोरोना रुग्णांत वाढ होत राहील. मात्र, त्यानंतर कोरोना रुग्णवाढ कमी होईल. कोविड रुग्णांमध्ये सध्याची वाढ SBB.1.16 या व्हेरिएंटमुळे आहे. जी ओमिक्रॉनचा उप-स्ट्रेन आहे. दरम्यान, देशात कोरोना रूग्णवाढ चिंताजनकरित्या वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत 10 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या जवळपास 45 हजार अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत.