लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून 12 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. लोणावळाजवळ असलेल्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.
पुण्याहून मुंबईला बस निघाली होती. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी प्रवासी बसमध्ये अडकलेले असल्याची शक्यता वर्तवली जात असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
बसमध्ये ४४ हून अधिक प्रवाशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, आणखी प्रवासी बसमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहेत. बचावपथकांकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माध्यमांना सांगितले की, खाजगी बसमध्ये मुंबईतील गोरेगावमधील बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) होते. ते सर्वजण पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली. बसमध्ये आणखी काही प्रवासी अडकल्याची भीती आहे. दरीत कोसळलेल्या बसमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांच्या मदतीला स्थानिक हायकर्स ग्रुप आणि आयआरबी टीम दाखल झाली आहे.
