खलिस्तानी समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’चा सर्वेसर्वा अमृतपाल सिंग अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही आहे. त्यातच अमृतपाल सिंगच्या पत्नीला अमृतसर विमानतळावरून पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. किरणदीप कौर, असं अमृतपाल सिंगच्या पत्नीचं नाव आहे. किरणदीप लंडनला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अमृतपाल सिंगबाबत किरणदीपकडे चौकशी केली जात आहे. किरणदीप ही आजच लंडनला जाणार होती. श्री गुरू रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी दीड वाजताच्या सुमारास लंडनसाठी उड्डाण घेणाऱ्या विमानात ती बसणार होती.
मात्र, त्याआधीच पंजाब पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. किरणदीपविरुद्ध एकही गुन्हा दाखल नाही. मात्र, तिला नजरकैदेत ठेवण्याची शक्यता आहे.
पंजाब पोलीस ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंगचा १८ मार्चपासून शोध घेत आहे. पण, अमृतपाल सिंगचा पोलिसांना अद्यापही थांगपत्ता लागला नाही.
