उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. सिल्वर ओकवर दोघांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दोघांच्यातील चर्चा अद्यार गुलदस्त्यात आहे. दरम्यान राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
हिंडेनबर्ग अहवालावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गौतम अदाणींवर जोरदार हल्लाबोल केला. या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली. तसेच या आरोपाची जेपीसीद्वारे चौकशी व्हावी, यासाठी विरोध आक्रमक आहेत. मात्र, शरद पवारांनी जेपीसी चौकशीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर अदाणी-पवारांच्या भेटीला महत्त्व आले आहे.
आताच्या काळात अदानी-अंबानी समूहांची नावे सरकारला लक्ष्य करताना घेतली जातात. अंबानी समूहाने पेट्रोकेमिकल्स आणि अन्य क्षेत्रांत भरीव काम केले आहे. अदानी समूहाने वीज व अन्य क्षेत्रांत मोठे काम केले आहे. देशाला त्याची गरज आहे. या समूहांनी बेकायदा किंवा काही चुकीचे केले असल्याचे पुरावे असतील तर टीका करण्याचा हक्क लोकशाहीत आहेच, पण पुरावे नसल्यास ते चुकीचे आहे’’, असे पवार म्हणाले.
गौतम अदाणी आणि शरद पवार यांच्यामध्ये काय चर्चा झाली, याचा तपशील अजून समोर आला नाही. मात्र, तब्बल दोन तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अदाणी आणि पवार यांचे सख्य जुनेच आहे. काही महिन्यांपूर्वी गौतम अदाणी यांनी बारामतीला भेट दिली होती. तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य स्वतः आमदार रोहित पवार यांनी केले होते. आजच्या भेटीत हिंडेनबर्ग रिपोर्ट, आक्रमक झालेले विरोधक ते जेपीसी चौकशी अशा साऱ्या विषयांवर अदाणी आणि पवारांमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
