पुंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या वाहनाला आग, 4 जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे पुंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या वाहनाला भीषण आग लागली. या अपघातात 4 जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताची माहिती मिळताच लष्कराचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये लष्कराच्या वाहनाला आग लागल्याचे दिसत आहे.