संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षणमंत्र्यांना सध्या सौम्य लक्षणांसह होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी करून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

बुधवारी (19 एप्रिल) राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये कमांडर कॉन्फरन्समध्ये भाग घेतला होता. तसंच आज (20 एप्रिल) ते भारतीय वायुसेना कमांडर्सच्या परिषदेत सहभागी होणार होते. मात्र, आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते आज या परिषदेत सहभागी होणार नाहीयेत. तसंच डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून सध्या त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 12,591 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4.48 कोटी झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत समोर आलेली ही सर्वाधिक रोजची प्रकरणे आहेत. त्याच वेळी, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 65,286 वर पोहोचली आहे.