बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग कोणत्याही वेगळ्या ओळखीवर अवलंबून नाही. हनी सिंग सध्या त्याच्या लेटेस्ट म्युझिक अल्बम हनी सिंग ३.० मुळे चर्चेत आहे. दरम्यान, आता यो यो हनी सिंगबद्दल मोठी बातमी समोर येत आहे.विवेक रमन नावाच्या व्यक्तीने यो यो हनी सिंग आणि इतरांविरोधात मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
एका प्रसिद्ध इव्हेंट कंपनीचे मालक विवेक रवि रमण यांनी यो यो हनी सिंग विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विवेक रमन नावाच्या व्यक्तीने बीकेसी, मुंबईमध्ये यो यो हनी सिंगचा फेस्टिविना कार्यक्रम आयोजित केला होता. 15 एप्रिल रोजी कार्यक्रम होता, पैशाच्या व्यवहारात बिघाड झाल्याने विवेकने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचा राग आल्याने हनी सिंग आणि त्याच्या साथीदारांनी विवेकचे अपहरण केले, त्याला मुंबईतील सहार येथील हॉटेलमध्ये डांबून ठेवले, तेथे त्याला मारहाण करण्यात आली. विवेकने त्याच्या तक्रारीत गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
सप्टेंबर २०२२ ला हनी सिंगचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये तो पुन्हा नव्या नात्यात आला होता. हनी सिंगने दिल्लीतील एका कार्यक्रमात टीना थडानीला डेट करत असल्याची घोषणा केली आहे. हनी सिंगने काही महिन्यांपूर्वी पत्नी शालिनी तलवारला घटस्फोट दिला होता.
