महात्मा गांधींचे नातू अरुण गांधींचं निधन, कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं आज कोल्हापुरात निधन झालं, वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं आहे. अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पूत्र तुषार गांधी यांनी दिली आहे. अरुण गांधी हे लेखक होते तसेच ते सामाजिक कार्यकर्ते देखील होते. अल्पशा आजारानं आज त्यांची प्राणज्योत मालावली.

१४ एप्रिल १९३४ रोजी डर्बन येथे अरुण गांधी यांचा जन्म झाला. ते मणीलाल गांधी आणि सुशीला मश्रुवाला यांचे पुत्र होते. अरुण गांधींचे आजोबा देखील समाजसेवक होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अरुण गांधी यांनी देखील समाजसेवेस सुरूवात केली.

अरुण गांधींचे द गिफ्ट ऑफ अँगर: अॅंड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रन्डफादर महात्मा गांधी हे पुस्तक प्रसिद्ध आहे. अरूण गांधी हे काही वर्षापूर्वी अमेरिकेत वास्तव्यास होते. महात्मा गांधीप्रमाणे ते अहिंसेच्या मार्गाचे पालन करत असे. यासाठी त्यांनी क्रिश्चियन ब्रदर्स युनिव्हर्सिटीमध्ये अहिंसेशी संबधित एक संस्था स्थापन केली होती.