सध्याचा आक्रमक शिवसैनिक म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील ओळखले जातात. गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. 5 जून 1966 रोजी जन्मलेल्या गुलाबराव पाटलांचा प्रवास रंजक आहे. एक साधा पानटपरीवाला ते थेट मंत्रीपदापर्यंत त्यांनी मुसंडी मारली आहे. मात्र, हा पल्ला गाठताना त्यांना प्रचंड संघर्षही करावा लागला आहे असं गुलाबराव पाटील कार्यकर्त्याना पटवून देत असतात.
राज्यात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध पदाधिकारी तयारी करताना दिसत आहे तशीच तयारी शिंदे गट करताना दिसत आहे जळगाव शहरात शिवसेनेच्या चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अजिंठा विश्रामगृह येथे ही बैठक संपन्न झाली या बैठकीत शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गुलाबराव पाटील याबैठकी वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले पाटील बोलताना म्हणाले की, आपापसातल्या भांडणामुळे आपल्या पक्षाचे नुकसान होणार आहे. हे लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या निवडणुकांसाठी कामाला लागलं पाहिजे. जर तुम्ही विश्वासघात करत असाल तर तुम्ही स्वतःचाही विश्वासघात करत आहात. हे लक्षात ठेवा उद्या जर तुम्हाला गुलाबराव पाटील हे नावच पक्षात नको असेल तर तसेही सांगा.
तसेच तुम्ही जे सांगणार ते मी करायला तयार आहे. तुम्ही सांगण्याप्रमाणे मी वागतो आहे. तरीदेखील तुम्ही आपापसात भांडत आहात. येत्या निवडणुकांमध्ये आपापसात न भांडता निवडणुकांना सामोरे जा आणि जिल्ह्यावर भगवा फडकवा. असे गुलाबराव पाटील म्हणाले.
