केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेवेळी आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण पार पडलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. अशोक चव्हाण यांचा नांदेड मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात येवून फडणवीस यांनी चव्हाणांना डिवचलं आहे. “अमित शाह यांची नांदेडला आम्ही सभा ठेवली तर अशोक चव्हाण म्हणाले, त्यांना निवडून येण्याची खात्री नाही म्हणून ते सभा घेत आहेत. अशोकराव असं नाहीय. आमच्याकडे 9 वर्षात केलेलं काम सांगण्यासारखं काम आहे, म्हणून आम्ही सभा घेतोय”, असं देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसला थोडस यश मिळाले की त्यांच्या डोक्यात हवा जाते. महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हटले. मात्र मी त्यांना सांगतो महाराष्ट्रात एचच पॅटर्न आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर देखील टीका केली. अशोक चव्हाण यांची मजल 2 जी, 3 जी आणि सोनियाजी इथंपर्यंत आहे, असे फडणवीस म्हणाले.
निवडणूक जवळ आल्या की, पवारांच्या स्टेटमेंट चालू होतात. 2014 च्या निवडणुकीपूर्वी शरद पवार तेच बोलले. 2019 ची निवडणूक, विधानसभा निवडणूक यामध्ये ते सारखेच स्टेटमेंट करतात. तसेच निवडणुका जवळ आल्या की, मोदींची लाट नाहीये, असं पवार सांगतात. असं सगळं सांगून पुन्हा हेच उघडे पडतात आणि मोदीच याठिकाणी निवडून येतात, अशी खोचक टीका फडणवीसांनी पवारांवर केली आहे.
