तुझ्या मालकाचा बेस्ट सीएम सर्व्हे कर्जतच्या फार्महाऊस वर झालेला की दिनो मोरियाच्या घरी? नितेश राणे यांचा संजय राऊत यांना सवाल

तुझ्या मालकाचा दर तीन महिन्यांनी येणारा बेस्ट सीएम सर्व्हे कर्जतच्या फार्महाऊस वर झालेला की दिनो मोरियाच्या घरी व्हायचा? असा सवाल भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना केला आहे.

राणे म्हणाले, महायुतीच्या बाजूने सर्व्हे आला की संजय राऊतच्या बुडाला आग लागते. दुसऱ्यांचा सर्व्हे सरकारी बंगल्यात झाला म्हणणाऱ्या संजय राऊत मग तुझ्या मालकाचा दर तीन महिन्यांनी येणारा बेस्ट सीएम सर्व्हे कर्जतच्या फार्महाऊस वर झालेला की दिनो मोरियाच्या घरी व्हायचा? संजय राजाराम राऊत यांनी हिम्मत असेल तर सुप्रिया सुळे यांनी गद्दारांवर केलेल्या वक्तव्यावर अग्रलेख लिहून दाखवावा. पण सिल्वर ओकवरुन अर्धा पगार येतो त्यामुळे ते हे धाडस करणार नाहीत, अशी टीका करताना राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या कानाला त्रास होतोय म्हणून टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे की त्यांच्या मालकाची मान ही दिल्लीसमोर वाकुन-वाकुन दुखतेय. त्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली. भाजपाच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी करता तशी नंदकिशोर चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे यांना किती खोके दिले या चौकशीचीही मागणी करा ना. त्याच्यावरही एक अग्रलेख लिहा ना. उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याचीही चौकशी करा.