ठाकरे गट खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. सकाळची पत्रकार परिषद बंद करा,अन्यथा गोळ्या घालू,अशी धमकी देण्यात आल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली आहे.गुरूवारी ( ८ जून ) ४ ते ४.१५ च्या दरम्यान तीन ते चार फोन आले. त्याने मला आणि संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिली. महिन्यात तुम्हाला गोळ्या घालून स्मशानात पाठवू. सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा दोघांना जीवे मारू,असं सुनील राऊत यांनी सांगितलं.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना धमकी देणाऱ्या मयुर शिंदेला अटक करण्यात आली आहे. राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. संजय राऊत धमकी प्रकरणी दिनांक (15 जून रोजी) मयूर शिंदे यांना अटक करण्यात आली राऊतांनी स्वतःची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहितीही नितेश राणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली आहे
राऊत बंधू हे राजकारणी आहेत की गँगस्टर? संदिप देशपांडेंचा सवाल या प्रकरणी बोलतान मनसे नेते संदिप देशपांडे म्हणाले, संजय राऊत आणि सुनील राऊत यांचे गँगस्टर लोकांशी संबंध आहे. माझ्यावर हल्ला करणारा व्यक्ती देखील संजय आणि सुनील राऊत यांच्या जवळील आहे. राऊत बंधू हे राजकारणी आहेत की गँगस्टर आहेत? हा प्रश्न उपस्थित राहत आहे. धमकीचा बनाव रचण्यासाठी मयुर शिंदेचा वापर राऊत बंधूंनी केला आहे.
मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी ही माहिती दिली आहे. मयुर शिंदे हा संजय राऊत यांच्या जवळचा आहे. मयुर शिंदेने संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा बनाव रचला होता. मयुर शिंदेने स्वत: फोन केले नाहीत. मात्र मयुर शिंदे हा या मागचा मुख्य सूत्रधार असून आपल्या जवळच्या साथीदारांना त्याने हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
