संजय राऊतांनी राजकारण सोडून नाटकात काम करावं – संदीप देशपांडे

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोनवरून धमकी देणाऱ्या आरोपीला कांजूर पोलिसांनी गुरूवारी बेड्या ठोकल्या आहेत. मयूर शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. दरम्यान, राऊत यांना धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर मनसेने एक खळबळजनक दावा केला.

या विषयावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत हा एक नंबरचा बोगस माणूस आहे, हे सर्व या प्रकरणात सिद्ध झालय” असं संदीप देशपांडे म्हणाले.“किती खोट बोलायच? किती खोटरडे आहेत? सुरक्षा मिळावी, तामझाम वाढावा, यासाठी किती नाटक करावी, याचं संजय राऊत मूर्तिमंत उदाहरण आहेत” संजय राऊतांनी राजकारण सोडून नाटकात काम केलं, तर ते चांगलं नाव कमावतील अशी बोचरी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

“तुम्ही तुमच्या माणसाला सांगता धमकीचे फोन कर. तो फोन करुन शिव्या घालायच नाटक करतो, सुनील राऊत त्याला शिव्या घालून उत्तर देण्याचं नाटक करतात. संजय राऊतांनी राजकारण सोडून नाटकात काम केलं, तर ते चांगलं नाव कमावतील” असं संदीप देशपांडे म्हणाले.“रोज सकाळी ते ज्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन हंगामा करतात, त्यांचे गँगस्टर्सशी संबंध असल्याच सिद्ध झालय. माझ्यावर जो हल्ला झाला, त्यात निलेश पराडकर नावाचा एक आरोपी असल्याची माहिती आहे. हा पराडकर गायब आहे. निलेश पराडकर संजय आणि सुनील राऊत यांच्या जवळचा माणूस आहे

खोटं बोलणं राऊतांच्या रक्तातच, नितेश राणेंचा टोला

खोटं बोलणं राऊतांच्या रक्तातच आहे, असं आमदार नितेश राणे यांनी म्हंटल आहे. “राऊतांनी कार्यकर्त्याला धमकी देण्याचे सांगून फोन रेकॉर्ड केला आहे. खोटं बोलणं राऊतांच्या रक्तातच आहे . राऊत दाऊदपासून सगळ्यांची भाषा करतो म्हणऊन मी याला भांडुपचा देवानंद म्हणतो.स्वतःच्याच कार्यकर्त्याकडून स्वतःलाच धमकी द्यायचा कॉल करून घ्यायचा आणि आपल्याला धमकी मिळाल्याचं सांगून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची. हा संजय राऊत तुम्हाला लवकरच जेल मध्ये दिसणार आहे.”