दूध भेसळ करणारे आणि भेसळयुक्त दूध खरेदी करणाऱ्या खासगी किंवा सहकारी दूध संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. अशा पद्धतीने कठोर कारवाईमुळे भेसळयुक्त दुधाला आळा बसणार असल्याचा दावा यावेळी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात दुधाचा दर ठरविण्याबद्दल आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दुग्धविकास मंत्री विखे पाटील म्हणाले की, दुधामध्ये होणारी भेसळ हा गंभीर प्रश्न आहे.
भेसळयुक्त दूध खरेदी करणाऱ्या दूधसंघ तसेच ज्या व्यापाऱ्यांसाठी भेसळ युक्त दूध तयार केले जात होते. त्यांच्याही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कठोर कारवाईमुळे दुधामध्ये भेसळ करण्याचे धाडस कोणी करणार नाही. दूध भेसळ रोखण्याकरीता तसेच कारवाईसाठी महसूल विभागाची मदत घेतली जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये अतिरिक्त पोलिस अधिक्षक, अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन अधिकारी, दुग्धविकास अधिकारी असतील. याबाबतचा शासन निर्णय येत्या दोन दिवसात प्रसृत केला जाईल. त्यामुळे तहसिलदार, प्रांताधिकारी यांच्या स्तरावरून सुद्धा दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुध्द कारवाई होईल.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन अधिकारी, दुग्धविकास अधिकारी असतील असेही यावेळी त्यांनी सांगितले. याबद्दलचा शासन निर्णय दोन दिवसांत येईल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या स्तरावरुन सुद्धा दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
