एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत अ‍ॅड.गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलचा एकतर्फी विजय

आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंक निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या सदावर्ते पॅनलची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेवर बाजी मारली आहे. सदावर्तेंच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला आहे.या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व 19 संचालकपदांच्या जागा सदावर्ते पॅनलने खिशात घातल्या आहे. एसटी कष्टकरी जनसंघ संघटनेच्या माध्यमातून सदावर्ते पॅनलमध्ये आणि शरद पवार पुरस्कृत कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये चुरस होती.

राज्यभरात ही निवडणूक २३ जून रोजी पार पडली. या निवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये एसटी कामगार संघटनेचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला आहे. निवडणुकीपूर्वी सदावर्ते म्हणाले होते कि या निवडणुकीत सर्वांच्या सर्व जागा निवडून आणेल आणि सदावरतेंनी ते करून दाखवलं.या बँकेच्या निवडणुकीत ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने सुरवातीपासूनच आघाडी घेतलेली होती. ती आघाडी शेवटपर्यंत कायम राहीली. त्यामुळे दुसऱ्या पॅनलला मोठा धक्का बसला.

कोरोना महामारिनंतर एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण, ७ वा वेतन आयोग अशा मुख्य मागण्यांसाठी सुमारे साडे पाच महिने चाललेल्या एसटी कामगारांचा संपाचा परिणाम एसटी बँकेच्या निवडणुकीत दिसून आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेनेच्या पॅनल मात्र, पिछाडीवर गेले असून, ७ व्या क्रमांकावर दिसून आले आहे.

राज्यातील विविध पक्षांच्या प्रस्तापित कामगार संघटनांना दूर करत नव्याने एसटी महामंडळात आलेल्या दोन संघटनांनी प्रचंड मुसंडी मारली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दोन्ही संघटनेने बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा ही जास्त मतदान घेतले आहे. यातही सदावर्ते यांच्या पॅननले एकतर्फी विजय मिळवला आहे.