शिवसेना ठाकरे गटाला आज आणखी एक धक्का बसणार असल्याचं सूचक ट्विट शिंदे गटाकडून करण्यात आलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी हे ट्विट केलं आहे. आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होणार आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून तो खऱ्या विचारांशी निष्ठा राखणार आहे. खरा कार्यकर्ता हा कधीही ठाकरे गटासोबत राहू शकत नाही, अशा अशायाची एक कविता नरेश मस्के यांनी ट्विट केली आहे.
नरेश मस्के यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आता ठाकरे गटातून शिंदे गटात नेमका कोणता नेता प्रवेश करणार आहे? याची चर्चा सुरू झाली आहे. नरेश मस्के यांनी ट्विटच्या माध्यमातून ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला आहे. खरा कार्यकर्ता हा कधीही ठाकरे गटासोबत राहू शकत नाही. आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होणार आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून तो खऱ्या विचारांशी निष्ठा राखणार आहे, अशा अशायाच ट्विट नरेश मस्के यांनी केलं आहे.
आपल्या ट्वीटमध्ये नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावताना “आज उबाठाचा आणखी एक मोहरा कमी होईल, खऱ्या शिवसेनेत येऊन विचारांची निष्ठा ठेवील”, असं म्हटलं आहे. तसेच, “सुपडा साफ होणार आणि तुमचे उखळ पांढरे होणार, ‘उठा’ तुमच्यावर लवकरच झोपायची वेळ येणार”, असा टोलाही या ट्वीटमधून नरेश म्हस्केंनी लगावला आहे. कवितेच्या स्वरूपात हे ट्वीट म्हस्केंनी केलं आहे. दरम्यान, म्हस्केंच्या या ट्वीटमुळे नेमक्या कोणत्या नेत्याबद्दल त्यांनी हे ट्वीट केल आहे? याचे अंदाज बांधले जात आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पक्ष प्रवेश होणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. मात्र पक्षप्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, नरेश म्हस्केंनी आपल्या ट्वीटबरोबर मुंबई महानगरपालिकेचा फोटोही ट्वीट केला आहे. त्यामुळे मुंबईतील ठाकरे गटाचा कोणता नेता शिंदे गटाबरोबर जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
